महाराष्ट्र
कॉंग्रेसच्या पराभवाला पटोलेच कारणीभूत
- राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव करत महायुतीने पुन्हा एकदा सत्तेवर दावा केला. महायुतीच्या या लाटेत मविआचा धुव्वा उडाला. एकेकाळी महाराष्ट्रात निर्विवाद सत्ता असणाऱ्या काँग्रेसला केवळ 16 जागांवर समाधान मानावे लागले. या पराभवानंतर आता काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळकेंनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप केला आहे.
- पटोले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध ठेवून आहेत. आगामी निवडणुकीत जर विजय मिळवालयाच असेल तर काँग्रेस नेतृत्वाने पटोलेंना बाजूला करावे, अशी मागणी बंटी शेळकेंनी केली आहे.
- विधानसभा निवडणुकीत नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रवीण दटके आणि काँग्रेसचे शेळके यांच्यात लढत होती. शेळके हे विजयाचे दावेदार मानले जात होते. पण, त्यांचा पराभव झाला. पराभवानंतर आता शेळके यांनी पटोलेंवर गंभीर आरोप केले. प्रचारात आघाडी घेऊनही काँग्रेस संघटनेच्या उदासीनतेमुळे आपला पराभव झाल्याचे शेळके यांनी सांगितले.कॉंग्रेसचा 85 जागांवर झालेल्या पराभवाला पटोले कारणीभूत आहेत, असेही शेळके म्हणाले.