क्राईम
बिग ब्रेकिंग! वाल्मिक कराडचा आणखी एक कांड

- सध्या वाल्मीक कराडचे नवनवे कारनामे उघड होऊ लागले आहेत. अशातच वाल्मीकवर राज्यातील ऊस तोडणी हार्वेस्टर चालकांकडून सबसिडीपोटी करोडो रुपये उकळण्याचा आरोप होत आहे.
- यात पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काही ऊस तोडणी यंत्र चालकांचाही समावेश आहे. फसवणूक झालेल्या या ऊस तोडणी चालकांनी थेट खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेत न्यायाची मागणी केली आहे. त्यामुळे वाल्मीकचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना हा प्रकार घडला आहे.
- बारामती तालुक्यातील रामचंद्र भोसले यांच्यासह अन्य ठिकाणच्या 140 ऊस तोडणी यंत्र चालकांकडून वाल्मीकने प्रत्येकी आठ लाख रुपये घेतले, असा आरोप शेतकरी करत आहेत. परळीमधील अनुसया लॉजवर वाल्मीकने ही रक्कम स्विकारली होती, असेही शेतकरी सांगत आहेत. विशेष म्हणजे हे सर्व शेतकरी मुंडे यांना भेटले होते.
- मुंडे यांनीच वाल्मीकला भेटण्याचा सल्ला दिला होता, असा आरोप भोसले या शेतकऱ्याने केला आहे.
- फसवणूक झालेल्या या शेतकऱ्यांनी आज खासदार सुळे यांची बारामतीत भेट घेतली. सुळेंसमोर या शेतकऱ्यांनी व्यथा मांडली. सुळेंनी प्रकरण समजून घेत पुण्याच्या एसपींना फोन लावला. आता पुणे एसपी यांनी या शेतकऱ्यांना बैठकीला बोलावले आहे.