हवामान

ब्रेकिंग! सोलापूर – पुणे महामार्गावर भिगवणजवळ ढगफुटी

  • मुसळधार पावसाने आज पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला. काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली. या दरम्यान एका ठिकाणी कार वाहून गेल्याची घटना घडली.स्वामी चिंचोली व निंबोडी परिसरातील ओढ्या नाल्यांचे येणारे पाणी स्वामी चिंचोली गावाजवळ तीन वाजण्याच्या सुमारास महामार्गावर आल्याने वाहतूक ठप्प झाली. चिंचोली परिसरात महामार्गाची उंची जमिनी लगत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह आला. यामुळे रस्ता बंद करावा लागला. महामार्ग प्राधिकरणाचे अधिका-यांनी याठिकाणी खबरदारीच्या उपाय योजना न केल्याने अशी परिस्थिती उद्भवल्याचे ग्रामस्थांनी आरोप केला आहे.महामार्ग परिसरातील नाल्यांची व्यवस्थित साफसफाई न केल्याने संततधार पावसाने या ठिकाणी महामार्गावर पाणी तुंबले. यामुळे या ठिकाणी काही काळ ट्राफिक जॅम झाले. 
  • जोरदार सुरू झालेल्या पावसाने सोलापूर पुणे महामार्गावर भिगवण जवळ तब्बल पाच किलोमीटर ट्राफिक जाम झाले होते. पुण्याहून भिगवण जवळ रस्त्यावर पाणी आल्याने एक वाहन वाहून गेल्याचे सांगण्यात आले त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी दक्षता म्हणून एक एक करून वाहने सोडली त्यामुळे पाच किलोमीटर रांगा दिसून होत्या. भिगवण जवळ ढगफुटी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Related Articles

Back to top button