देश - विदेश
सुपरस्टार पवन कल्याण यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला, भारतीय झाले जाम खुश

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेत आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) बैठक झाली. या बैठकीला एनडीए सरकारचे विविध राज्यातील 20 मुख्यमंत्री आणि 17 उपमुख्यमंत्री उपस्थित होते.
- यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण एकत्र आले. त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील होते, या भेटीचा फोटो पवन कल्याण यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
- एनडीएच्या विशेष परिषदेमध्ये पवन कल्याण आणि एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींसोबत संवाद साधला आणि त्यानंतर त्यांच्यासोबत फोटोही काढले. हेच फोटो सोशल मीडियावर शेअर करताना पवन कल्याण यांनी म्हटले की, आपल्या देशाचे खरे हिरो, आपले प्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भोजनाचा योग आला. राष्ट्राप्रती असलेले प्रेम आणि वचनबद्धता आपल्या सर्वांनासाठी नेहमीच प्रेरणादायी आहे.
- या फोटोचा एक किस्साही समोर आला आहे. आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकत्र आले. यावेळी एकनाथ शिंदे आणि पवन कल्याण यांच्यात चित्रपटासंबंधी चर्चा सुरु होती. पवन कल्याण हे हिरो आहेत, अशी चर्चा सुरु असताना एकनाथ शिंदेंनी देशाचे खरे हिरो पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, असे सांगितले. त्याचवेळी मोदी तिथे आले. एनडीए शासित दोन्ही राज्यांच्या उपमुख्यमंत्र्यांमध्ये काय चर्चा सुरु आहे, असे त्यांनी विचारले. त्यावर आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण म्हणाले की, एकनाथ शिंदे म्हणतात मी हिरो आहे, पण देशाचे सर्वात मोठे हिरो नरेंद्र मोदी आहेत. या प्रसंगी तुमच्यासोबत एक फोटो हवा आहे. या संवादानंतर पंतप्रधान मोदींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि अभिनेता आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी पंतप्रधानांसोबत फोटो घेतला.
- पंतप्रधानांसोबतचा हाच फोटो पवन कल्याण यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. या परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूर आणि जातीय जनगणनेसाठी पंतप्रधान मोदींच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.



