महाराष्ट्र
ब्रेकिंग! राज्यात मुसळधार पावसाचा अक्षरशः धुमाकूळ

- पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. स्वामी चिंचोली परिसरात पाण्याचा जोरदार प्रवाह महामार्गावर आल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
- याच दरम्यान एक कार पाण्यात वाहून गेल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
- स्वामी चिंचोली व निंबोडी परिसरातील ओढ्या-नाल्यांना आलेल्या पूराच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे, दुपारी तीन वाजता महामार्गावर पाणी चढले. चिंचोली परिसरात महामार्गाची उंची फारशी नसल्याने जमिनीच्या पातळीवरून वाहणारे पाणी थेट रस्त्यावर आले. यामुळे वाहनचालकांची प्रचंड गैरसोय झाली.
- दरम्यान वाहतुकीचा अडथळा सुरू असताना एका कारने पाण्यातून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने कार वाहून गेली. सुदैवाने कारमधील व्यक्तींना वेळीच बाहेर काढण्यात आले, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.



