तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर…

Admin
1 Min Read

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त यश मिळाले आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 46 जागांवर यश आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला तगडा झटका बसला आहे. महाविकास आघाडीतील नेतेमंडळी निकालाआधी कोण मुख्यमंत्री बनेल, सरकार कधी स्थापन करायचे? याबाबत ठरवत होते.

पण निकाल अतिशय वेगळा लागला. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते या निकालावर संशय निर्माण करत आहे. ईव्हीएममध्ये घोळ करण्यात आल्याने आपल्या सर्वाधिक उमेदवारांचा पराभव झाला, असा दावा महाविकास आघाडीकडून केला जात आहे. याच दाव्यासह महाविकास आघाडीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळली आहे. महाविकास आघाडीने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी याचिकेत केली होती. ती याचिका कोर्टाने फेटाळली आहे.

सुप्रीम कोर्टाने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची याचिका फेटाळली आहे. पराभव झाला तर ईव्हीएममध्ये बिघाड आणि निवडणूक जिंकली तर ते यश असे कसे होऊ शकते? असा सवाल सुप्रीम कोर्टाने केला आहे. मतदारांना प्रलोभन दाखवताना पैसे, दारू किंवा अन्य वस्तूंचे वाटप केल्यास उमेदवाराला पाच वर्ष निवडणूक लढवण्यावर बंदी असेल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

Share This Article