राजकीय
ब्रेकिंग! मतदान करताच शरद पवार स्पष्टच म्हणाले
- राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत असून, त्यात ४,१३६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. पवार म्हणाले, महाराष्ट्राचे भवितव्य नागरिकांच्या हातात आहे. प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 67 टक्के मतदान झाले होते. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये त्यावेळी मतदानाची टक्केवारी 75 ते 80 टक्के इतकी होती. महाराष्ट्राने मतदानाच्या टक्केवारीत मागे राहणे, हे अशोभनीय आहे. म्हणून माझं आवाहन आहे, मतदानाचा हक्क हा कोणत्याही परिस्थितीत बजावला पाहिजे. यावेळी पवार म्हणाले, “महाराष्ट्राचे भवितव्य नागरिकांच्या हातात आहे. प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 67 टक्के मतदान झाले होते. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये त्यावेळी मतदानाची टक्केवारी 75 ते 80 टक्के इतकी होती. महाराष्ट्राने मतदानाच्या टक्केवारीत मागे राहणे, हे अशोभनीय आहे. म्हणून माझे आवाहन आहे, मतदानाचा हक्क हा कोणत्याही परिस्थितीत बजावला पाहिजे.
- तसेच मी काही ज्योतिषी नाही. पण एकूण चित्र असे दिसतेय की, राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल. मला असे दिसतेय की, इकडे सत्तापरिवर्तन होईल, लोकांना बदल अपेक्षित आहे, असे पवार म्हणाले.