राजकीय
मतदान झाले की माझ्याकडे यादी येईल…
- राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत असून, त्यात ४,१३६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. ९ कोटी ७० लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यात यंदा तब्बल सहा प्रमुख पक्ष रिंगणात आहेत. त्याचबरोबर अन्य छोटे पक्ष तसंच बंडखोरही रिंगणात असल्याने सर्वच मतदारसंघात चुरशीची लढत होत आहे. दरम्यान काँग्रेसच्या चंद्रपूर खासदार प्रतिभा धानोरकर यांचा मतदारांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
- धानोरकर म्हणाल्या, आज जे लोक माझा विरोध करीत आहेत. माझ्या विरोधात बोलत आहेत. आत्ता मी कुणाला काहीही बोलणार नाही. त्यांनी लक्षात घ्यावे की, लोकसभा क्षेत्रात 2800 गावे आहेत. या गावांतील कोण कार्यकर्ता माझ्या बाजूने होता. कोण विरोधात होता. प्रत्येकाचा आढावा आजही माझ्याजवळ आहे. ही तर एक विधानसभा आहे. फक्त 300 गावांची आहे. या विधानसभेतील गावनिहाय, घरनिहाय कुणी विरोध केला आणि कोण बाजूने होता याचा चिठ्ठा काढण्यास फार वेळ लागणार नाही. 20 नोव्हेंबरला मतदान झाले की, गावनिहाय यादी माझ्याकडे येईल. कोणाला कसे ठेवायचे आणि कुणाला बारीक करायचे याचा सर्व विचार मी या ठिकाणी करून आहे, असा दमही त्यांनी दिला.