हवामान
ब्रेकिंग! राज्यात उष्माघाताचा पहिला बळी

- मार्च महिना सुरू होताच उन्हाळ्याची चाहूल लागते, पण यंदा फेब्रुवारी महिन्यातच सूर्य आग ओकू लागला आहे. दरम्यान सांगली जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे राज्यातील वाढत्या तापमानाचा धोका अधोरेखित झाला आहे.
- सांगली शहरातील हिराबाग कॉर्नर येथे एका आईसक्रीम विक्रेत्याला उष्माघातामुळे भोवळ आली. त्यानंतर रक्ताच्या उलट्या होऊन त्याचा मृत्यू झाला. रामपाल असे या व्यक्तीचे नाव असून ते परप्रांतीय विक्रेते होते.
- प्राथमिक माहितीनुसार, रक्ताच्या उलट्या होऊन त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.