- मान्सून राज्यात लवकर दाखल झाला आहे. संपूर्ण राज्यात त्याने दमदार हजेरही लावली आहे. पण सोलापूर जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा सातपट जास्त पाऊस झाला आहे. मे महिन्यात एवढा पाऊस झाल्यामुळे प्रशासन ही हबकले आहे. मात्र, त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना अधिक सतर्क राहावे लागणार आहे.
- सोलापूर जिल्ह्यात सरासरी 32 मिलिमीटर इतका पाऊस पडतो. मात्र, आत्ताच 171 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे सात पट पावसाची क्षमता वाढली आहे. आगामी पंढरपूरच्या वारीत देखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यादृष्टीने आपत्ती व्यवस्थापन प्रणाली कार्यरत असणार आहे, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
- हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा सोलापूर जिल्ह्यात 108 टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे कायमच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होईल. माळशिरस आणि पंढरपूर सारख्या ठिकाणी नागरिकांना बचाव कार्य करावे लागेल. त्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आहे. आज याबाबत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली आहे. तर उजनी धरण गेल्या काही दिवसात पावसामुळे पंधरा टक्के क्षमतेने वधारले असल्याचे देखील कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
- दरम्यान राज्यात मान्सूनने दमदार हजेरी लावली आहे. सोलापूरमध्ये तसा तुलनेने कमी पाऊस पडतो. मात्र यंदा सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा सातपट पाऊस
