देश - विदेश

ब्रेकिंग! NICU वॉर्डमध्ये अग्नितांडव

देशात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील झांसी येथील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्य शुक्रवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत रुग्णालयातील नवजात बालकांच्या विभागात दाखल दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाला. ही आग मोठी असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

आग लागल्याचे समजताच पळापळ सुरू झाली. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक बाहेर पळू लागले. यामुळे येथे धावपळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या विभागाने 37 बालकांना सुरक्षित बाहेर काढले.

झांसीचे जिल्हाधिकारी अविनाश कुमार यांनी सांगितले की कदाचित शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली असू शकते. या घटनेचा सखोल तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. जखमींना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. 

शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही घटना नेमकी कशी घडली. यामागे काय परिस्थिती होती, काय कारणे घडली असावीत याचा तपास केला जात आहे असे सांगण्यात आले. आग लागली त्यावेळी येथे 52 ते 54 नवजात बालके एनआयसीयू मध्ये होती. यातील दहा बालकांचा मृत्यू झाला आहे तर 16 बालकांवर उपचार सुरू आहेत.

Related Articles

Back to top button