राजकीय
बिग ब्रेकिंग! शरद पवार पुन्हा पावसात भिजले
- जेष्ठ नेते शरद पवारांची साताऱ्यात भर पावसात झालेली सभा पाच वर्षानंतरही कोणी विसरले नाही. त्या एका सभेने 2019 च्या विधानसभा निवडणुकीचे चित्रच पालटून गेले होते. या एका सभेने चुरशीची झाली. त्यावेळचे पवारांचे पावसात भिजत भाषण केलेले व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती इचलकरंजी इथं झाली.
- पवार इथं पक्षाचे उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचारासाठी आले होते. पवारांनी भाषणाला सुरूवात केला. त्याच वेळी पावसालाही सुरूवात झाली. पवारांनी पावसाला सुरूवात होताच आपलं भाषण थांबवलं नाही. तर त्यांनी भाषण सुरूच ठेवलं. त्यामुळे पावसात उभ्या असलेल्या लोकांनीही जोरदार घोषणाबाजी, टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत पवारांना प्रतिसाद दिला.
- पवार व्यासपीठावर आले. त्यावेळी ढगाळ वातावरण होतं. पाऊस होणार अशी चिन्ह होती. त्यामुळे पवारांनी आल्या आल्या भाषणाला सुरूवात केली. पण भाषणाला पवार जसे उठले तसा पाऊस सुरू झाला. पवार पावसात भिजत होते. त्यावेळी उपस्थितांनी त्यांना जोरदार प्रतिसाद दिला. माझ्या सभेचा आणि पावसाचा काही तरी संबध आहे. मी बोलायला उभा राहीलो की पावसाला सुरूवात होते. त्यानंतर निवडणुकीचा निकालही चांगला लागतो. असे ते म्हणाले. त्यानंतर एकच जल्लोष करत शिट्ट्या आणि टाळ्यांनी संपूर्ण सभास्थळ दणाणून सोडले.