राजकीय

20 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. सध्या संपूर्ण राज्यात प्रचार सभा आणि गाठीभेटींचा धडाका सुरु आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोग देखील मतदानाचा टक्का वाढवण्याची मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे.

या बातमीनुसार मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत आता राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

मंत्रालयातील सर्व विभागांना विनंती करण्यात येते की, त्यांनी सदरची अधिसूचना त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणावी. तसेच केंद्र शासनाधीन शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालयचे सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असेही परिपत्रकात म्हटले आहे. तसेच याबाबत राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभाग यांनी सदर अधिसूचना काढून प्रसिद्ध करावी, असे आदेशही राज्यपाल यांनी दिले आहेत.

Related Articles

Back to top button