राजकीय
ब्रेकिंग! शरद पवारांचे फोटो वापरू नका
- राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधूमाळी सुरू आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये पडलेल्या फूटीनंतर हा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे घड्याळ चिन्ह गोठवा, अशी मागणी करणारी याचिका शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. त्याचा आता निर्णय समोर आला आहे. तसेच, सुप्रीम कोर्टाचे आदेश अजितदादा गटाकडून पाळले जात नसल्याचा आरोपही ठेवण्यात आला होता. या याचिकेवर 7 नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली होती. तेव्हा कोर्टाने अजितदादा गटाला घड्याळ चिन्हाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याबद्दल 36 तासांत वृत्तपत्रांत जाहिरात देण्याचे आदेश दिले होते. यानंतर आज या प्रकरणी पुन्हा सुनावणी पार पडली आहे.
- आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने अजित पवार पक्षाला काही महत्वाचे निर्देश दिले आहेत. अजितदादा गटाचे घड्याळ चिन्ह गोठवण्यात यावे, अशी मागणी शरद पवार गटाने केली होती. या मागणीला कोर्टाने नकार दिला आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने निवडणुकीत स्वतंत्र पक्ष म्हणून सामोरे जावे, तसेच शरद पवारांचे फोटो किंवा व्हिडिओ वापरू नये, असे आदेश सुप्रीम कोर्टाने अजितदादा गटाला दिले आहेत. आता याबाबत पुढची सुनावणी 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे.