राजकीय

ब्रेकिंग! शिवसेना, राष्ट्रवादी फोडण्यामागे मास्टरमाइंड कोण ?

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख आठ दिवसांवर येवून ठेपली आहे. अशातच प्रचार सभा, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी देखील सुरू आहेत. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा महायुती सरकारला लक्ष केले. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यामागे कोणाचा हात होता? राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडण्यामागे कोणाचा हात होता? हे गौतम अदानी आणि अजितदादा पवार यांना विचारा, असे राऊत आज पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले.

राऊत पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की, शरद पवार यांनी पक्ष फोडला की गौतम अदानी यांनी पक्ष फोडला हे अजितदादा पवारांना विचारा. अजितदादा कबुल करत आहेत की, महाराष्ट्रातले सरकार हे अदानीने पाडले आणि शिवसेना, राष्ट्रवादी फोडण्यामागे देखील नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांची हातमिळवणी आहे.

पुन्हा बॅग तपासणीच्या मुद्द्यावर आक्रमक होत राऊत म्हणाले की, गृहमंत्री अमित शहा यांची बॅग तपासून दाखवा. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅग तपासणे एक दिखावा आहे. ठाकरेंसारखे नेते बॅगेतून पैसे नेणार का? 

Related Articles

Back to top button