देश - विदेश
ब्रेकिंग! भारतीयांचे रक्त खवळलंय, दहशतवादी आणि त्यांच्या आकांना मोठा धडा शिकविणार

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमात मोठे वक्तव्य केले आहे. आज मन की बात कार्यक्रमाचा 121 वा भाग पार पडला. यावेळी मोदी यांनी पहलगाम हल्ल्यावर भाष्य केले आहे. त्यांनी यावेळी पीडित कुटुंबांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, दहशतवादाविरुद्धच्या आपल्या लढाईत संपूर्ण जग 140 कोटी भारतीयांसोबत उभे आहे. मी पुन्हा एकदा पीडित कुटुंबांना आश्वासन देतो की, त्यांना न्याय मिळेल.
- ‘मन की बात’मध्ये मोदी म्हणाले की, 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी घटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला दुःख झाले . प्रत्येक भारतीयाला पीडित कुटुंबांबद्दल सहानुभूती आहे. दहशतवादी हल्ल्याचे फोटो पाहून प्रत्येक भारतीयाचे रक्त सळसळ करत आहे.
- काश्मीर जळत राहावे हे दहशतवाद्यांच्या आकांना वाटते. पहलगाममधील हा हल्ला दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांचा भ्याडपणा दर्शवितो. काश्मीरमध्ये शांतता परतत होती, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये चैतन्य होते. बांधकाम कामांना अभूतपूर्व गती मिळाली होती, लोकशाही मजबूत होत होती. पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ होत होती, लोकांचे उत्पन्न वाढत होते, तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत होत्या. देशाच्या शत्रूंना, जम्मू आणि काश्मीरच्या शत्रूंना हे आवडले नाही.
- दहशतवाद्यांना काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करायचे आहे, म्हणूनच त्यांनी एवढा मोठा कट रचला. दहशतवादाविरुद्धच्या या युद्धात देशाची एकता, 140 कोटी भारतीयांची एकता ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. ही एकता दहशतवादाविरुद्धच्या आपल्या निर्णायक लढाईचा आधार आहे. देशासमोरील या आव्हानाला तोंड देण्याचा आपला निर्धार आपल्याला बळकट करायचा आहे. या भयानक दहशतवादी हल्ल्याचा सर्वांनी तीव्र निषेध केला आहे. संपूर्ण जग भारतासोबत उभे आहे. या हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि कट रचणाऱ्यांना सर्वात कठोर उत्तर दिले जाईल, असे मोदी म्हणाले.



