- महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पडळकर आणि आव्हाड यांच्यात वाकयुद्ध पाहायला मिळत आहे. तर काल दोघांकडून एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली होती. तर आज दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.
- सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, विधानभवनाच्या लॉबीमध्ये दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली आणि यानंतर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या अंगावर धावून जात मारहाण केली. तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षक आणि इतरांनी मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना दूर केले.
ब्रेकिंग! लाजा सोडल्या, सॉलिड राडा
