क्राईम

ब्रेकिंग! मध्यरात्री पुन्हा हायहोल्टेज राडा

  • विधीमंडळाच्या आवारात काल जोरदार राडा झाला. आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांव तुटून पडले. अंगातील शर्ट फाटेपर्यंत मारामारी झाली. या घटनेने राज्यातील राजकारण आणि समाजमन अस्वस्थ झाले आहे. फक्त मारामारीपर्यंतच हा प्रकार थांबला नाही. तर गुरुवारी मध्यरात्रीनंतरही अटक नाट्यावरून चांगलाच राडा झाला.
  • ज्या कार्यकर्त्याला मारहाण झाली, त्याच कार्यकर्त्याला पोलीस अटक करत आहेत, असा दावा आव्हाडांनी केला. इतकेच नाही तर आव्हाड यांनी थेट पोलिसांच्या गाडीसमोरच ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत कार्यकर्त्याला सोडणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका आव्हाड यांनी घेतली. यानंतर आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना डावलून नितीन देशमुख यांना दुसऱ्या गाडीतून पोलीस स्टेशनला नेण्यात आले. या संघर्षा दरम्यान पोलिसांना आव्हाड यांना खेचून बाहेर काढावे लागले.
  • विधानभवनाच्या लॉबीमध्ये पडळकरांच्या पाच कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनीच तंबाखू मळून दिली. वडापाव आणून दिला, असा दावा आव्हाड यांनी केला आहे.

Related Articles

Back to top button