विधानभवन परिसरात काल सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांत तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची? असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड- गोपीचंद पडळकर यांच्या राड्यावरुन संताप व्यक्त केला आहे.
सत्ता हे साधन असावे, साध्य नाही. याचा विसर पडल्यामुळे वाट्टेल त्या लोकांना पक्षात घ्यायचे, त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधनशुचितेच्या गोष्टी बोलायच्या. हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल, असे मी मानतो. मी तर मराठी जनतेलाच विचारेन, ‘कोणाच्या हातात दिला आहेत महाराष्ट्र?, असेही राज म्हणाले.