राजकीय

सर्वाधिक वेळा सोलापुरात आलेला बहुधा मी पहिलाच पंतप्रधान असेन

  • विकासाचे ध्येय असलेले स्थिर सरकारच महाराष्ट्राकरिता दूरगामी नीती राबवू शकते. काँग्रेस आणि त्यांच्या महाआघाडीच्या गाडीला चाके नाहीत, ब्रेक नाहीत, गाडी कोणी चालवायची यासाठी भांडणे सुरू आहेत. निवडणुकीआधीच मुख्यमंत्रीपदासाठी एकमेकांशी भांडणारे अस्थिर लोक स्थिर सरकार देऊ शकत नाहीत, राज्याचा विकास करू शकत नाहीत, त्यामुळे स्वच्छ नीती आणि सेवाभावाचे संस्कार असलेल्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीला साथ द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोलापूर येथे जिल्ह्यातील महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या विशाल जाहीर सभेत बोलताना केले. यावेळी खा. धनंजय महाडिक, ज्येष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी आणि उमेदवार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, देवेंद्र कोठे, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, राम सातपुते, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे आदी उपस्थित होते.
  • सर्वाधिक वेळा सोलापुरात आलेला बहुधा मी पहिलाच पंतप्रधान असेन, असे प्रतिपादन करून केंद्र सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने देशात व राज्यात राबविलेल्या अनेक यशस्वी योजनांचा आढावा घेताना मोदी यांनी महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली.
  • समस्या कायम ठेवून लोकांना त्यामध्ये गुरफटवून ठेवणे ही काँग्रेसची नीती असून यामुळे त्यांनी जनतेला अनेक दशके हलाखीचा अनुभव दिला. यामुळेच शेतकरी, माताभगीनी त्यांना कधीही माफ करणार नाहीत, असे ते म्हणाले. महायुती सरकारने शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केले, आता प्रत्येक शेतात सौर ऊर्जा पोहोचविण्यासाठी आम्ही झटत आहोत. प्रत्येक शेतीपंप सौरऊर्जेवर चालणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणाऱ्या अनेक योजना आम्ही देशात राबविल्या आहेत. ऊसाची आधारभूत किंमत निश्चित केली, इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन दिले, असे ते म्हणाले. इथेनॉल तंत्रज्ञान अगोदरपासूनच होते, पण अगोदरच्या सरकारांना शेतकऱ्यांना तडफडत ठेवण्यातच मजा वाटत होती, असा आरोप मोदी यांनी केला.

Related Articles

Back to top button