राजकीय
ब्रेकिंग! शरद पवारांचा मोठा गेम
- राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यावेळी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. अशातच राज्यात सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. मात्र सध्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणात उडत आहेत. अशातच विधानसभा निवडणुकी दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रयत क्रांती सेनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना सर्वात मोठा धक्का दिला आहे.
- यावेळी रयत क्रांती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी शिंदे यांनी पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. यावेळी जळगावमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. शिंदे यांनी रयत क्रांती संघटना सोडण्यामागचे कारण सांगितले आहे.
- खोत यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते पवार यांच्यावर टीका केली होती. परंतु, मला ही टीका पटली नाही. त्यामुळे मी आता हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिंदे म्हणाले. तसेच सध्या खोत हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून लांब गेलेले आहेत. त्यामुळे त्यांचे काम हे व्यक्ती केंद्रीत झाले आहे, अशी टीका शिंदे यांनी केली.