क्राईम

ब्रेकिंग! कुछ तो बडा होने वाला है…

जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करीत 27 जणांचा जीव घेतला. हल्ला घडल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सैन्याच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. या बैठकीला जनरल उपेंद्र द्विवेदी, एअर चीफ मार्शल एपी सिंह, नौदलाचे प्रमुख दिनेश त्रिपाठी उपस्थित होते.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या उत्तरासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. या बैठकीत जम्मू काश्मीरमधील सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा झाली. ज्या भागात दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे, त्या भागात जवानांना तैनात करण्यात आले असून लवकरात लवकर हल्लेखोरांना पकडण्यासाठी जवानांकडून प्रयत्न सुरु आहेत. या हल्ल्यासंदर्भात केंद्रीय समितीची बैठक आज पार पडणार आहे. तसेच भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांना तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Back to top button