क्राईम
करारा जवाब मिलेगा! पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे फोटो प्रसिद्ध

जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये काल झालेल्या दहशवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मोठी खळबळ माजली असून हल्ला करणाऱ्या दहशवाद्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. या सर्व घडमोडींमध्ये सुरक्षा यंत्रणांकडून पहलगामध्ये हल्ला करणााऱ्या दहशतवाद्यांचे फोटो जारी करण्यात आले आहेत. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी या परिसराची रेकी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीय स्तरावर उच्चस्तरीय बैठका पार पडत असून सुरक्षा दलांसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर सैन्याच्या तिन्ही दलांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.