राजकीय
तो व्हिडीओ व्हायरल करु नका
- सध्या संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून केल्या जात झालेल्या प्रचारामुळे निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. दरम्यान, सुरुवातीला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती, मात्र त्यानंतर आपण माघार घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपल्या सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर जरांगे यांची पुढची रणनीती काय असणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर जसजशी निवडणूक जवळ येत आहे, तसतशी जरांगे यांची रणनीती स्पष्ट होताना दिसत आहे.
- मराठा समाज संभ्रमात आहे, असे पसरवले जात आहे, मात्र मराठा समाज संभ्रमात नाही. ज्यांना स्वत:ला निवडून यायचे आहे, ते संभ्रम निर्माण करत आहेत. समाजाला सर्व माहीत आहे. ज्याला पाडायचे त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचे त्याला निवडून आणा, मी स्पष्ट सांगितले आहे. ज्यांनी अन्याय केला, डोक्याच्या चिंधड्या केल्या, त्यांना सोडायचे नाही. आपल्या मागणीशी संबंधित असणाऱ्यांचे व्हिडीओ करून घ्या, जो आपल्या मागण्याशी सहमत राहील त्यांला निवडून आणा, पण तो व्हिडीओ व्हायरल करू नका, असे जरांगे यांनी सांगितले. जरांगे पुढे म्हणाले की गाव पातळीवर याबाबत निर्णय घ्यावा. व्हिडीओ पण बनवा आणि लिहून पण घ्या. गावागावात व्हिडीओ बनवा, पण ते व्हायरल करू नका.