राजकीय
ब्रेकिंग! शरद पवार गटाचे आमदार अशोक पवारांच्या मुलाचे अपहरण
- विधानसभा निवडणुकीत सर्वाच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. उमेदवारांनीही प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. सत्ताधारी आणि विरोधक अनेक ठिकाणी एकमेकाला भिडल्याच्या घटनाही समोर येत आहेत.
- त्यात शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात एक धक्कादायक घटना घडली आहे. या मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार अशोकराव पवार यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
- शिरूर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अशोकराव पवार हे रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांचा मुलगा ऋषीराज यांच्यावर आहे. ते सध्या वडीलांचा प्रचार करत होते. त्यावेळी अनेक कार्यकर्ते त्यांना भेटत होते.
- गेल्या काही दिवसापासून एक कार्यकर्ता विरोधकांकडून त्यांच्याकडे आला होता. तो ही प्रचार करत होता. त्यानेच गोड बोलून ऋषीराज यांचे अपहरण केले. एका बंगल्यामध्ये डांबून ठेवले असा आरोप ऋषीराज याने केला आहे. त्यानंतर त्याला मारहाण ही करण्यात आली.
- ज्या बंगल्यात त्याला डांबून ठेवण्यात आले होते. तिथेच एका महिलेला बोलावण्यात आले. त्यानंतर दोघांनाही कपडे काढण्यास सांगितले. त्याचा व्हिडीओ संबधित व्यक्तीने तयार केला. नंतर ती महिला तिथून निघून गेली अशी माहिती ऋषीराज पवार यांनी दिली. या व्हिडीओसाठी आपल्याला दहा कोटी ऑफर आहे असे ते अपहरणकर्ते सांगत होते असं ऋषीराज याने सांगितले. त्यांच्या बरोबर गोड बोलून आपण तुम्हाल पैसे देवू असे सांगितले. त्यानंतर तिथून कशीबशी सुटका ऋषीराज याने करून घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
- ही धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे घडली आहे. सुटका झाल्यानंतर ऋषीराज याने शिरूर पोलिस ठाणे गाठले. झालेल्या घटनेची सर्व माहिती पोलिसांना दिली. शिवाय याची चौकशी करून यामागे कोण आहेत त्याचा छडा लावावा, अशी मागणी केली आहे. आपल्या बरोबर झालेला सर्व प्रकार ऋषीराज याने व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून पत्रकारांना सांगितला आहे.