खेळ
ब्रेकिंग! चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानची नाचक्की

- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत आज पाकिस्तान विरूद्ध बांग्लादेश हे दोन संघ आमने सामने येणार होते. पण पावसामुळे हा सामना रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघाना प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला आहे.
- पाकिस्तान संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीतले सुरूवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. आजचा बांग्लादेशविरूद्धचा शेवटचा सामना खेळून ते स्पर्धेचा शेवट गोड करणार होते. पण हा शेवट काही गोड झालेला नाही. कारण पाकिस्तानला बांग्लादेश विरूद्धचा शेवटचा सामना जिंकायचा होता. पण पावसामुळे हा सामना रद्द झाला.त्यामुळे स्पर्धेचा शेवट गोड करण्याचे पाकिस्तानचे स्वप्न भंगले आहे.
- या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. त्यामुळे पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्याची संधी होती. पण चॅम्पियन्स ट्रॉफी काय, पाकिस्तानला साधा एक सामनाही जिंकता आला नाही. पावसामुळे फुकटात एक गुण देखील मिळाला आहे.
- विशेष म्हणजे याआधी अशी अवस्था कुठल्याच संघाची झाली नव्हती. जी आता पाकिस्तानची झाली आहे. पाकिस्तानला एकही सामना जिंकता आला नाही आणि एक गुण मिळाला तोही पावसाच्या जिवावर. त्यामुळे पाकिस्तानची नाचक्की झाली आहे.