क्राईम
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींनी खूनाची कबुली दिली, म्हणजे…

- बीडमधील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर चार महिन्यांनी आरोपींनी अखेर गुन्ह्याची कबुली दिली आहे. यानंतर संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
- आरोपींनी खूनाची कबुली दिली असली, तरी आम्ही समाधानी आहोत असे म्हणणे फार घाईचे होईल, असे ते म्हणाले. न्याय मिळवण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने गेल्या चार महिन्यांत मोठा संघर्ष केला आहे. कृष्णा आंधळे याला तातडीने अटक करण्यात यावी आणि सर्व आठही आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. त्यांनी सांगितले की, गुन्हा कबूल करणे म्हणजे न्याय झाला असे समजून चालणार नाही, जोपर्यंत न्यायालय दोषींना कठोर शिक्षा करत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आरोपींना अटक होण्यासाठी आंदोलने आणि प्रयत्न करावे लागले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.