देश - विदेश
ब्रेकिंग! आम्ही वक्फ विधेयक….
- भाजप प्रणित केंद्र सरकारचा प्रमुख विरोधा पक्ष तेलुगू देसम पक्षाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. टीडीपीने वक्फ दुरुस्ती विधेयकाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. दिल्लीत झालेल्या भारतीय संविधान सुरक्षा परिषदेत टीडीपीचे उपाध्यक्ष नवाब जान उर्फ अमीर बाबू यांनी या विधेयकाला विरोध असल्याचे म्हटले आहे.
- केंद्र सरकार वक्फ संशोधन विधेयक आणण्याची योजना आखत आहे. दरम्यान भाजपचा मित्रपक्ष टीडीपीने एक विधान केले आहे. टीडीपीचे उपाध्यक्ष नवाब जान उर्फ अमीर बाबू यांनी म्हटले की, आम्हाला हे विधेयक यशस्वी होऊ द्यायचे नाही. ते दिल्लीत आयोजित भारतीय संविधान सुरक्षा संमेलनात बोलत होते. त्यांनी म्हटले की, हे भारताचे दुर्दैव आहे की, गेल्या १०-१२ वर्षात असे काही घडले आहे, जे घडायला नको होते.
- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे कौतुक करताना अमीर बाबू यांनी म्हटले की, ते सेक्युलर विचारसरणीचे नेते असून हिंदू व मुसलमान दोघांना एकाच नजरेने बघतात. टीडीपी केंद्र सरकारचा प्रमुख मित्रपक्ष आहे. आता टीडीपी उपाध्यक्षाच्या विधानानंतर चंद्राबाबू नायडू काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.