राजकीय
ब्रेकिंग! महाविकास आघाडीचे सरकार आल्यास सात दिवसांत…
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास पुढील सात दिवसांत चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतील आणि आम्ही सरकार पाडू, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आम्ही महिलांना तीन हजार रुपये देऊ. महिलांवर अत्याचार करण्याचा कुणीही प्रयत्न करणार नाही आणि आमच्या लहान बहिणींनाही पूर्ण सुरक्षा दिली जाईल. सरकारकडे आमच्या पोलिसांना पगार द्यायला पैसे नाहीत, महागाई वाढली आहे. सरकारची तिजोरी रिकामी आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सात दिवसांच्या आत चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतील, असे आव्हाड यांनी सांगितले.