जरांगेंच्या पाठीशी महाराष्ट्रातील बडा नेता

Admin
1 Min Read
  • मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मतदारसंघही ठरले आहेत. दरम्यान जरोगेंनी निवडणुकीस उमेदवार उतरण्याची घोषणा करताच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या घणाघाती टीका केली आहे. जरांगें-पाटील बारामतीतून मॅनेज झाले आहेत, सर्व जागांवर उमेदवार उभे करणारे आता दोन, तीन जागांवर आले आहेत. त्यामुळे लवकरच जरांगे इतिहास जमा होतील, अशी टीका त्यांनी केली आहे.
  • मराठा समाजाचे लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या जात होत्या. मुस्लिम, दलित समाजाच्या मनात भीती निर्माण झाली होती. ज्यांनी त्यांना पैसे दिले, गाड्या दिले त्यांना ओबीसी समाज कधीही मतदान करणार नाही. जे उमेदवार जरांगेंना रात्री भेटले, त्यांच्या विरोधात जरांगे उमेदवार देणार नाहीत. आमचा रोष ज्या-ज्या माणसांनी जरांगे यांना पाठिंबा दिला, त्यांच्यावर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
Share This Article