- राज्यात मान्सूनचा परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. मुंबई पुण्यासह सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यात पावसाने कहर केला आहे. ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. घरे आणि वाहने पाण्याखाली गेली आहेत. पावसाची परिस्थिती पाहता आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
- पुणे शहर आणि जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हडपसर, लोणी काळभोर या भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागातील रस्ते पाण्याखाली गेले. इतकेच नाही तर लोकांच्या घरात पाणी शिरले. वाहने देखील अर्ध्यापर्यंत पाण्याखाली गेली आहेत. पुण्यात आजही अतिमुसळधार पाऊस होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
- चिंचवड परिसरात 40 मिमी पावसाची नोंद झाली आहे. लोहगांव, हडपसर, हवेली, शिवाजीनगर, मगरपट्टा, कोथरूड भागात जोरदार पाऊस पडला. मागील तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे शाळा प्रशासनाने शाळांना सुट्टी दिली आहे. काही ठिकाणी झाडे पडली आहेत. रस्त्यावर पाणी साचले आहे. हडपसर भागात बहुतांश शाळांना सुट्टी दिली आहे. पुण्यातही काही भागातील शाळा आज बंदच राहणार आहेत.
ब्रेकिंग! पुण्यात ढगफुटीसदृश्य पाऊस
