राजकीय
बंडखोरीमुळे महायुतीचे टेन्शन वाढले

- विधानसभा निवडणुकीची रेलचेल सगळीकडेच चालू आहे. यात काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा हे अज्ञातवासात गेले होते आणि आता पक्षाचा आणखी एक नेता नॉट रिचेबल झाला आहे. पालघर जिल्ह्यातील शिंदे गटाचा आणखी एक नेता नॉट रिचेबल झाला आहे.
- पालघर जिल्ह्यात शिंदे गटाच्या वाट्याला आलेल्या दोन जागांवर शिंदे गटाने दोन्ही ठिकाणी भाजपमधून आयात केलेल्या उमेदवारांना संधी दिली. ऐनवेळी शिवसेनेत आलेल्या उमेदवारांना संधी मिळाल्याने पालघरमधील स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. धोडी हे नॉट रिचेबल आहेत. आयात उमेदवारांना संधी मिळत असल्याने कार्यकर्त्यांच्या मनात खदखद असल्याची प्रतिक्रिया धोडी यांनी नॉट रिचेबल होण्यापूर्वी दिली होती.
- धोडी यांनी बोईसर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विलास तरे यांच्याविरोधात बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सध्या राज्यात बंड क्षमवण्यासाठी महायुतीकडून बंडखोरांना फोनद्वारे संपर्क केला जात आहे. मात्र, याचवेळी बंडखोर धोडी तीन दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.