राजकीय
नवा ट्विस्ट! मराठा समाजाची वाट लावू नका नाही तर तुमचे नाव लिहून मी आत्महत्या करणार

मराठा समाजासाठी लढणारे नेते मनोज जरांगे यांना एका तरुणाने रक्ताने पत्र लिहिले आहे. सध्या सोशल मिडीयावर एक पत्र प्रचंड व्हायरल होत आहे. जरांगेंच्या भूमिकेमुळे व्यथित होत एका मराठा समाजातील तरुणाने रक्ताने हे पत्र लिहिले आहे.
जरांगे यांची भूमिका महायुतीसाठी पोषक आहे, असे पत्रात म्हटले आहे. मराठा समाजातील मतांमध्ये फूट पडणार आहे, असे संबंधित तरुणाचे म्हणणे आहे. जरांगे यांनी ज्या ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे मराठा समाजातील मतांमध्ये फूट पडणार असल्याचे पत्रात नमूद आहे. इच्छुक मराठ्यांमध्ये भांडणे लावू नका, असेही पत्राद्वारे जरांगेंना सांगण्यात आले आहे. शिंदे, सामंत, चिवटे, यांच्या नादाला लागून समाजाची वाट लावू नका. नाही तर तुमचे नाव लिहून मी आत्महत्या करणार, असे पत्रात म्हटले गेले आहे.



