क्राईम

लक्ष्मी पूजन आटोपून सहकाऱ्यांसह बसले: ४० ते ५० जणांच्या टोळक्याने…

  1. राज्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण बुलडाण्याच्या चिखली विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाच्या अधिकृत उमेदवारावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वकील शंकर चव्हाण यांच्यावर ४० ते ५० अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात चव्हाण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर चिखली येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
  2. मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाण हे बहुजन समाज पार्टीचे चिखली विधानसभेचे उमेदवार आहेत. काल रात्री चव्हाण हे मेहकर फाटा परिसरातील त्यांच्या हॉटेलवर लक्ष्मी पूजन आटोपून सहकाऱ्यांसह बसले होते. त्यावेळी ४० ते ५० जणांच्या टोळक्याने त्यांना लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत बहुजन समाज पार्टीचे उमेदवार चव्हाण हे गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. चव्हाण यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.

Related Articles

Back to top button