महाराष्ट्र

ब्रेकिंग! मुख्यमंत्री असावा तर असा..

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा अनुभव आला आहे. सध्या सगळीकडे दिवाळीचा उत्साह तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे.
  • अशावेळी प्रत्येक नेता आपापली गणिते जुळवण्यात व्यस्त असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र आपला मदतीचा हात कायम पुढे करण्यात जराही कसूर ठेवत नाहीत, याचाच पुन्हा एकदा प्रत्यय आला. बिकेसीमध्ये गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास बाईकस्वाराच्या मदतीला शिंदे धावून गेल्याचे पाहायला मिळाले.
  • गुरुवारी रात्री वर्षा बंगल्यावरील नियोजित बैठका आटोपून रात्री उशिरा एकनाथ शिंदे आपल्या निवासस्थानी जाण्यासाठी ठाण्याच्या दिशेने जात होते. यावेळी बिकेसी येथील ब्रिजवर त्यांना एक बाईकस्वार जखमी अवस्थेत पडून असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तत्काळ आपला ताफा थांबवून जखमी तरुणाची विचारपूस केली. यावेळी त्यांना तरुणाच्या हाताला दुखापत झाल्याचे समजले. अशावेळी त्यांनी तत्काळ आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिकेमधील डॉक्टराना बोलावून तरुणांच्या हातावर उपचार करण्यास सांगितले. यानंतर जखमी तरुणाची विचारपूस करून तो ठीक असल्याची खात्री पटल्यानंतरच ते ठाण्याच्या दिशेने निघाले.

Related Articles

Back to top button