राजकीय
ब्रेकिंग! आधी लाडकी बहीण होते, आता इम्पोर्टेड माल झाले का?

- ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटाच्या उमेदवार शायना एन. सी. यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा गदारोळ उठला आहे. शायना यांनी अरविंद सावंत यांच्याविरोधात मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली असून या तक्रारीवरून गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
- मात्र त्यानंतरही हा वाद काही शांत होताना दिसत नाही. सावंत यांनी माफी मागितली आहे. मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सावंत यांनी बाजू घेत महिलांचा काहीही अपमान झाला नसल्याचा दावा केला आहे.
- राऊत यांनी सावंत यांनी बाजू घेतल्यानंतर शायना यांनी आज पत्रकार परिषद घेत जोरदार हल्ला चढवला. त्या म्हणाल्या की, काल सावंत माझ्याबद्दल जे बोलले, ते अत्यंत चुकीचे आहे. स्वाभिमानी महिलेला ते माल म्हणतात आणि अमिन पटेल हसतात.
- आज सावंत यांनी माझी माफी आहे, पण राऊत म्हणतात की महिलांचा कोणताही अपमान झालेला नाही. 2014 मध्ये आणि 2019 मध्ये मी तेव्हा त्यांची लाडकी बहीण होते. मला प्रचारासाठी बोलवत होते. सावंत यांच्या प्रचारासाठी मी जात होते, पण आता मी इम्पोर्टेड माल झाले आहे. इम्पोर्टेड उमेदवार? असे त्यांनी म्हटले आहे, असा आरोप शायना यांनी व्यक्त केला.



