क्राईम

ब्रेकिंग! बोलेरोने रस्त्यावर उभे असलेल्या पाच जणांना चिरडले

  • राज्यात सध्या रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत चालली आहे. भरधाव वेगातील वाहनांकडून पायी चालणारी किंवा रस्त्याच्या कडेला झोपलेली माणसे चिरडली जाण्याच्या घटनाही वाढीस लागल्या आहेत. 
  • आताही असाच एक भीषण अपघात नंदूरबार जिल्ह्यात घडला आहे. नंदूरबार तालुक्यातील लोय पिंपळोद गावाजवळ एका बोलेरा गाडीने रस्त्याच्या कडेला दुचाकीसह उभ्या असलेल्या नागरिकांना चिरडले. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ऐन दिवाळी सणात ही घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
  • काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नंदूरबार ते धानोरा रस्त्यावर एक बाईक खराब झाली होती. या ठिकाणी आणखीही दोन बाईक थांबलेल्या होत्या. त्याचवेळी धानोरा गावाकडे भरधाव वेगात एक बोलेरो जीप निघालेली होती. 
  • या जीपने बाईकसह रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांना चिरडले. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की तीन दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला. बोलेरोही उलटून पडली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक येथे गोळा झाले. त्यांनी बोलेरो जीप सरळ केली. 
  • या अपघातातील एका जखमी व्यक्तीला नंदूरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा व्यक्ती गंंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. यानंतर पोलीसही येथे दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेेतली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Related Articles

Back to top button