सोलापूर
जुना सहकारी गेल्याचे दुःख…

माजी महापौर महेश कोठे यांच्या निधना संदर्भात सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिक्रिया
महेश कोठे यांनी त्यांचे वडील तात्यासाहेब कोठे यांचा वारसा समर्थपणे चालवला होता. महापौर म्हणून त्यांनी चांगले काम केले होते. पूर्वी आम्ही सर्वजण एकत्रच होतो. नंतर वेगळे झालो. ते वेगवेगळ्या पक्षात गेले पण दुर्दैवाने त्यांना राजकीय यश आले नाही. माझा एक जुना सहकारी गेल्याचे दुःख आहे. –
सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री.