क्राईम
आरोपी अक्षय शिंदेला केलेल्या कृत्याचा अजिबात पश्चाताप नाही

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची एसआयटीकडून चौकशी केली जात आहे. या चौकशीत तो प्रत्यके प्रश्नांची उत्तरे देत आहे. न्यायालयासमोर अक्षयला जेव्हा हजर केले जाते. तो न्यायाधीशाकडून विचारण्यात आलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देतो. त्याच्या कृत्याने राज्यभरात काय पडसाद उमटले. याची त्याला काही चिंता नाही. त्याला त्याने केलेल्या कृत्याचा काहीही पश्चाताप दिसत नाही. त्याच्या शरीरिक हालचालीतून देखील काही चुकीचे घडले असल्याचे दिसून येत नाही. हे पाहून पोलीसही हैराण आहेत.
आरोपी अक्षयची त्याची ओळख परेड व्हायची आहे. चार वेळा त्याला न्यायालयात हजर केले आहे. त्याला अटक झाल्यानंतर त्याच्या घराची तोडफोड करण्यात आली. त्याच्या कुटुंबियांना घर सोडून अन्य ठिकाणी आसारा घ्यावा लागला.
त्याचे कुंटुंब उद्धवस्त झाले आहे. कुटुंब भितीच्या वातावरणाखाली आहे. या सगळ्याचा अक्षयवर कोणताही परिणाम झालेला नाही. त्याला आपल्या कृत्याची कुठेही पश्चाताप झाल्याचेही दिसत नाही, अशी माहिती समोर येत आहे.