राजकीय

ना बबनदादा, ना रणजितसिंह शिंदे

  • माढ्यात आमदार बबनदादा शिंदे यांनी निवडणुकीतून माघार घेत मुलगा रणजतिसिंह शिंदे हे निवडणूक लढणार असल्याचे सांगितले होते. मात्र, बबनदादा शिंदे यांनी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे माढ्यातून कोणाला उमेदवारी द्यावी, असा पेच अजितदादांना पडला होता. अखेर अजितदादांना माढ्यासाठी उमेदवार सापडला आहे.
  • माढ्याच्या नगराध्यक्ष मीनल साठे यांना अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बबनदादा आणि रणजितसिंह शिंदे यांचा पत्ता कट झाला आहे. मीनल यांच्यासमोर अभिजीत पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार ) आणि रणजितसिंह शिंदे (अपक्ष ) यांचे आव्हान असणार आहे.
  • मुळच्या काँग्रेसमधील असलेल्या माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल यांनी सकल मराठा समाजाकडून उमेदवारी मिळाली म्हणून प्रयत्न केला होता. त्यापूर्वी मीनल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) आणि काँग्रेसकडेही उमेदवारीसाठी मुलाखत दिली होती. त्यामुळे मीनल कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार, असा सवाल उपस्थित होत होता.
  • तसेच, बबनदादा शिंदे यांनी विधानसभा निवडणूक लढण्यास नकार दिला होता. रणजितसिंह शिंदे हे निवडणूक लढणार असल्याचे बबनदादांनी स्पष्ट केले होते. मात्र, अजितदादांच्या राष्ट्रवादीत असलेल्या बबनदादांनी रणजितसिंह शिंदे यांना ‘तुतारी’कडून उमेदवारी मिळावी म्हणून ‘फिल्डिंग’ लावली होती. 
  • मात्र, रणजितसिंह शिंदे यांच्या उमेदवारीस शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी विरोध केल्यामुळे तिथून अभिजीत पाटील यांना संधी देण्यात आली. रणजितसिंह हे अपक्ष निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे माढ्यातून कुणाला उमेदवारी द्यावी, असा पेच अजितदादांसमोर उभा राहिला होता. अखेर मीनल साठे यांना अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली असून त्यांची ‘लॉटरी’ लागली आहे. त्यामुळे माढ्यात मीनल साठे विरुद्ध अभिजीत पाटील विरुद्ध रणजितसिंह शिंदे, अशी तिरंगी लढत होणार आहे.

Related Articles

Back to top button