राजकीय

चष्मा काढला, पाणी प्यायले अन् डोळे पुसले अन्…

सध्या बारामती विधानसभा मतदारसंघातील वातावरण तापले आहे. येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार अशी थेट लढत होणार आहे. आता स्वत: ज्येष्ठ नेते शरद पवार अजितदादा पवारांच्या विरोधात युगेंद्र यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी आज अजितदादा पवारांची थेट नक्कलच केली.

अजितदादा यांची काल बारामतीमध्ये सभा झाली होती. त्यावेळी पवार घराण्यातील फुटीबाबत बोलताना अजितदादा भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. शरद पवार यांनी आज बारामतीमधील सभेत अजितदादा यांच्या रडण्याची नक्कल केली. पवारांच्या या कृतीनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पवार यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Related Articles

Back to top button