राजकीय

ब्रेकिंग! ऐन निवडणुकीत ठाकरेंकडून तीन जिल्हाप्रमुखांची हकालपट्टी

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस असून उमेदवारी अर्ज सादर करण्याची लगबग सुरू झाली आहे. महाविकास आघाडी तसेच महायुतीकडून जवळपास सगळ्याच उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. मात्र त्याआधी ठाकरे गटाने तीनजिल्हाप्रमुखांना घरचा रस्ता दाखवला आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी त्यांची ठाकरे गटाकडून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात वेगाने राजकीय घडामोडी घडण्यास सुरूवात झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून ठाकरे गटाकडून किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, तनवाणी यांनी उमेदवारी नाकारली. त्यानंतर ठाकरे गटाकडून शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर तनवाणी यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.

यातच पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे महाड आणि श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांची तसेच भोर आणि खडकवासला मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख शंकर हिरामण मांडेकर यांची देखील उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती माजी खासदार विनायक राऊत यांनी दिली.

Related Articles

Back to top button