महाराष्ट्र
ब्रेकिंग! धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून आदेश

- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनाचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो बाहेर आल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेकजण सोशल मीडियावर तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज बीड जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडीनंतर आता कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा अटळ मानला जात आहे.
- कारण हे फोटो समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्रीच देवगिरी बंगल्यावर जात उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांची भेट घेतली आहे. फडणवीसांनी प्रसारमाध्यमांना चकवत अजितदादा पवारांचे निवासस्थान गाठले. याठिकाणी जवळपास दीड ते दोन तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या ठिकाणी आधीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते.
- या बैठकीनंतर फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचे सूत्रांची माहिती आहे. त्यानुसार आज मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर करतील, अशी शक्यता आहे.