राजकीय
ब्रेकिंग! काँग्रेसची चौथी यादी जाहीर, पंढरपुरात मोठा धमाका
- राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे.
- अशातच आता काँग्रेस पक्षाकडून 14 उमेदवारांची चौथी यादी प्रसिद्ध करण्यात आली असून यामध्ये पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक दत्तात्रेय बहिरट आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
- तर पंढरपूर मधून माजी आमदार स्वर्गीय भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी मिळाली आहे.
- कोणाला कुठून मिळालं तिकीट?
- १.अमळनेर : डॉ.अनिल शिंदे
- २. उमरेड – अनुसूचित जाती: संजय नारायणराव मेश्राम
- ३. आरमोरी – एसटी : रामदास मसराम
- ४. चंद्रपूर – अनुसूचित जाती: प्रवीण नानाजी पाडवेकर
- ५. बल्लारपूर : संतोषसिंग चंदनसिंग रावत
- ६. वरोरा : प्रवीण सुरेश काकडे
- ७. नांदेड उत्तर : अब्दुल सत्तार अब्दुल गफूर
- ८. औरंगाबाद पूर्व : लहू एच. शेवाळे
- ९. नालासोपारा : संदीप पांडे
- १०. अंधेरी : अशोक जाधव पश्चिम11.
- ११. शिवाजीनगर : दत्तात्रय बहिरट
- १२. पुणे कॅन्टोन्मेंट – अनुसूचित जाती: रमेश आनंदराव भागवे
- १३. सोलापूर दक्षिण : दिलीप ब्रह्मदेव माने
- १४. पंढरपूर : भगीरथ भालके.