राजकीय

ब्रेकिंग! शरद पवारांचा पॅटर्नच वेगळा

  • सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधून जेष्ठ नेते शरद पवार गटाकडून माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सिद्धी या महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या उमेदवार आहेत. 
  • मोहोळ मतदारसंघात सिद्धी यांचा सामना राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे यशवंत माने यांच्याशी होणार आहे. या मतदारसंघात राजन पाटील यांचे वर्चस्व आहे. नुकतीच त्यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. 
  • रमेश कदम हे जामिनावर बाहेर आहेत. अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळात झालेल्या घोटाळा प्रकरणात रमेश कदम यांना सलग 8 वर्षे जेलमध्ये राहावं लागलं. याशिवाय आगामी काळात त्यांचा जामीन रद्द झाला तर पुन्हा जेलमध्ये जावे लागले तर त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते. यामुळे शरद पवार गटाने रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे.
  • त्या निवडून आल्या तर महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात कमी वयाच्या आमदार म्हणून नवे रेकॉर्ड होऊ शकते.

Related Articles

Back to top button