राजकीय
अजित पवार बारामतीत पंच्याहत्तर हजार मतांनी पडतील

- बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नीचा पराभव झाला होता. तीच अवस्था आता अजितदादा पवारांची बारामतीत होणार आहे. ते किमान पंच्याहत्तर हजार मतांनी पडतील, असा दावा शरद पवार गटाचे नेते तथा माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार उत्तम जानकर यांनी केला.
- विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अजितदादा संपलेले दिसतील. ते कधीही नेते नव्हते. या निवडणुकीनंतर त्यांचे राजकारण संपलेले असतील. त्यानंतर राजकारणातून संपलेले अजितदादा त्यांच्या मूळ व्यवसायाकडे म्हणजेच गुरांच्या गोठ्याकडे परततील, असा टोलाही जानकरांनी लगावला.
- जानकर पुढे म्हणाले की, माळशिरसमध्ये जर भाजपला उमेदवार मिळत नसेल तर मी त्यांना एखादा उमेदवार मिळवून देईन. विद्यमान आमदार राम सातपुते आणि भाजपमध्ये सध्या तिकीट देण्यावरून संघर्ष सुरू आहे. सातपुतेंनी जो काही मलिदा येथे मिळवला, तो खर्च करुन निवडणूक लढवावा, असा भाजपचा दबाव त्यांच्यावर आहे. मात्र, सातपुते निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचा दावा जानकर यांनी केला.