राजकीय

ठाकरेंचा गोंधळात गोंधळ

  • राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यादृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून काल वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, मलबार हिल आणि दहिसर विधानसभेसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले. दहिसर विधानसभा मतदारसंघातून तेजस्वी घोसाळकर आणि विनोद घोसाळकर दोघेही इच्छुक होते.
  • त्यामुळे सासरे आणि सूनेमध्ये उमेदवारी कोणाला मिळणार, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला होता. त्यानुसार पहिल्यांदा तेजस्वी घोसाळकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. परंतु काही वेळातच विनोद घोसाळकर यांचे नाव समोर आले.
  • सुरुवातीला ठाकरे गटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून तेजस्वी घोसाळकर यांचे नाव जाहीर करण्यात आले. परंतु, तासाभरातच हे नाव बदलण्यात आले आणि त्याजागी विनोद घोसाळकर यांचे नाव एडीट करण्यात आले. त्यामुळे आत दहिसर विधानसभा मतदारसंघासाठी विनोद घोसाळकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे.
  • दरम्यान ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची 8 फेब्रुवारी रोजी फेसबुक लाईव्ह करून हत्या करण्यात आली होती. या हत्येत मॉरिस नोरान्हा उर्फ मॉरिसभाईचे नाव समोर आले होते.

Related Articles

Back to top button
जॉईन व्हाट्सअप ग्रुप