राजकीय

ब्रेकिंग! फडणवीस यांच्याशी आमची दुश्मनी नाही

राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, महायुतीसह महाविकास आघाडीने उमेदवारांची नावे जाहीर केली असून त्यांनी अर्ज देखील दाखल केले आहेत. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर मत व्यक्त केले आहे.

व्यक्तिगत दुश्मनी राजकारणात असू नये. पण भाजपने व्यक्तिगत दुश्मनी तयार केली आहे. राजकारणात विचारांची लढाई विचाराने व्हावी. व्यक्तिगत दुश्मनी घेऊन राजकारण करू नये. हे महाराष्ट्रामध्ये एक संस्कार आहेत. भाजपच्या हातात विशेषतः फडणवीस यांच्या हातात आणि दिल्लीमध्ये मोदी – शहा यांच्या हातात सूत्र गेल्याने राजकारण हे कुटुंबापर्यंत दुश्मनी निर्माण करण्यापर्यंत गेला आहे. फडणवीस यांच्याशी आमची वैयक्तिक दुश्मनी नाही. ते केवळ आमचे राजकीय शत्रू आहेत. पण मी फडणवीसांसोबत कधीही चहासुद्धा प्यायला नाही. मी एक कडवट शिवसैनिक आहे, असे मत राऊत यांनी व्यक्त केले.

Related Articles

Back to top button