राजकीय
ब्रेकिंग! काँग्रेस 30 तारखेला करणार धमाका

- दिवाळीची शुभ भेट म्हणून राज्यातील जनतेसाठी उद्याच्या सरकारकडून जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत, त्यासाठी आमचा जाहीरनामा तयार आहे. हा जाहीरनामा आम्ही 30 तारखेला प्रसिद्ध करणार आहोत, अशी माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज सकाळी दिली आहे. तसेच आम्ही भाजपच्या जाहीरनाम्याची वाट पाहत आहोत. 15 लाखाच्या ठिकाणी पंधराशे रुपये देऊन जी जनतेची बोळवणी केली, त्यामुळे अजून पुढे काय त्या जाहीरनाम्यामध्ये आहे, हे लक्षात येते असे म्हणत वडेट्टीवारांनी महायुतीवर हल्लाबोल केला.
- आमचा जाहीरनामा हा सर्वसमावेशक असणार आहे. शेतकऱ्यांपासून ते शेतमजुरापर्यंत सर्वांना न्याय देणारा आमचा जाहीरनामा असेल. लोकांना बनवाबनवी नको आहे, लोकांना गॅरंटी पाहिजे. जी गॅरंटी आम्ही तेलंगणा तसेच कर्नाटकामध्ये पाळली आहे. महालक्ष्मी योजना अद्यापही सुरू आहे. तिथे काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कारण त्यांनी खोटी अफवा पसरवली की, तेलंगणा आणि कर्नाटकामध्ये महालक्ष्मी योजना बंद पाडली. मात्र ती योजना अद्यापही सुरू आहे, असे वडेट्टीवारांनी सांगितले.



