राजकीय

मैं चुनाव नहीं लड़ना चाहता

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली आहे. विविध पक्ष निवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर करत आहेत. काल, भाजप, ठाकरे गट, शरद पवार गट यांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. तर काँग्रेसनेसुद्धा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. या यादीत अंधेरीतून सचिन सांवत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, याच उमेदवारीवरून ते नाराज झाले आहेत. त्यांना वांद्रे येथून निवडणूक लढवायची होती. मात्र, ही जागा ठाकरे गटाला गेल्यामुळे ते नाराज झाले. त्यांनी काल ट्विट करत अंधेरीतून लढण्यास नकार देत मतदारसंघ बदलून देण्याची मागणी केली आहे.

जागा वाटपावरून महाविकास आघाडीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यावरून दोन्ही पक्षात धुसफूस सुरू आहे. असे असतांनाही दोन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते असलेले व प्रसार मध्यमानांवर पक्षाची बाजू मजबूत पणे मांडणारे सावंत यांना अंधेरी पश्चिम मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, ते येथून लढण्यास इच्छुक नसून त्यांनी नाराजी व्यक्त करत मतदारसंघ बदलून देण्याची मागणी केली आहे.

सांवत यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. परंतु तो मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे गेला आहे. मी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती. तरी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. परंतु मी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नितला यांना पक्षाने निर्णय बदलावा याकरिता विनंती केली आहे. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी माझ्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील ही आशा बाळगतो.

Related Articles

Back to top button